प्रधानमंत्री पिक विमा योजनेची मुदत वाढवली किती तारखेपर्यंत भरता येणार पिक विमा ?
✍️तालुका प्रतिनिधी : सुगत उराडे
पिक विमा भरण्याची प्रस्तावित अंतिम तारीख ही 31 जुलै ठेवण्यातआली होती अनेक शेतकऱ्यांनी अद्यापही पिक विमा भरलेला नाही. तसेच काही शेतकऱ्यांनी पिक विमा भरण्यासंदर्भात मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी केली होती. तांत्रिक अडचणींमुळे पीकविमा अर्जापासून एकही शेतकरी वंचित राहू नये!प्रधानमंत्री फसल बीमा योजनेअंतर्गत पीकविमा अर्ज भरताना अनेक शेतकरी बांधवांना ऑनलाइन पोर्टलवरील तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. वेबसाइट वारंवार बंद पडणे, सर्व्हरमधील समस्या तसेच ऑनलाइन अर्ज प्रक्रियेत येणाऱ्या अडथळ्यांमुळे अनेक पात्र शेतकरी पीकविमा योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली होती त्या करीता PMFBY नोंदणीची अंतिम तारीख आता वाढवून 10 ऑगस्ट 2026 करण्यात आली आहे.
