आष्टीत भाजपला मोठे बळ; दोन महिला सरपंचांचा पक्षप्रवेश
आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या उपस्थितीत पदाधिकारी बैठक; संघटन विस्तारावर भर
✍️ सुगत उराडे | प्रतिनिधी
आष्टी | दि. १ ऑगस्ट
गडचिरोली विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे संघटन अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या उपस्थितीत आष्टी येथील शासकीय विश्रामगृहात भाजप पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीत स्थानिक विकासकामे, नागरिकांच्या समस्या, बूथ सशक्तीकरण, जनसंपर्क वाढविणे तसेच आगामी राजकीय वाटचालीबाबत सविस्तर चर्चा करून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत ग्रामपंचायत आष्टीच्या सरपंच सौ. बेबीताई बुरांडे आणि ग्रामपंचायत मार्कंडा (कं.)च्या सरपंच सौ. वनश्रीताई चापले यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. पक्षाचा दुपट्टा परिधान करून त्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले.
यावेळी बोलताना आमदार डॉ. मिलिंद नरोटे म्हणाले की, “भारतीय जनता पक्ष हा सर्वसामान्यांच्या विकासासाठी कटिबद्ध असून, जनतेचा वाढता विश्वास हीच पक्षाची खरी ताकद आहे. नव्याने पक्षात दाखल झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या सहभागामुळे संघटन अधिक सक्षम होईल.”
बैठकीस भाजपा ज्येष्ठ नेते बाबुरावजी कोहळे, जिल्हा उपाध्यक्ष अनिलजी पोहनकर, भाजयुमो जिल्हाध्यक्ष मधुकरजी भांडेकर, अविनाशजी विश्रोजवार, भाजयुमो जिल्हा महामंत्री पवनजी रामगिरकार, नरेशजी अलसावार, अनंतजी प्रधान, रवीजी आलचेट्टीवार, देवाजी बोरकुटे, संदीपजी तिवाडे, विनोदजी भोयर, राजनाथजी कुशवाह, माजी जिल्हा परिषद सदस्य धर्मप्रकाशजी कुकुडकर, भाजयुमो तालुकाध्यक्ष विनोदजी भोयर, कपिलजी मसराम यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
