महाराष्ट्र शासन एकीकडे ‘रस्ते आणि पुलांचे जाळे’ विणून ग्रामीण भागाचा विकास करत असल्याचा दावा
ग्रामीण भागाचा विकास करत असल्याचा दावा करत असले, तरी गडचिरोली जिल्ह्यातील सिरोचा तालुक्यातील नैगुंडा व झिगाणूर या दोन गावांच्या नशिबी मात्र अद्यापही तीव्र उपेक्षाच आली आहे. नैगुंडा ते झिगाणूर या अवघ्या ६ किलोमीटर अंतरादरम्यान पुला उपलब्ध नाही; त्यातच दोन्ही गावांच्या मध्यभागी असलेला नाला पार करण्यासाठी साधा पूलही उभारण्यात आलेला नाही. रस्ता आणि पूल या दोन्ही मूलभूत सुविधां अभावी या भागातील नागरिकांना दैनंदिन ये-जा करण्यासाठी कमालीचा कसरतीने प्रवास करावा लागत आहे
दोन्ही गावांचे नागरिक कोणत्या भीषण परिस्थितीमध्ये जीवन जगत आहेत,लोक अडचणींचा सामना करत असताना प्रशासन शाशन यंत्रणा आणि दोन्ही मात्र गाढ झोपेत आहेत की काय, असा उद्विग्न सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. या दुर्लक्षामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी शाशन व प्रशासन कारभाराबाबत तीव्र नाराजी व दिलगिरी व्यक्त केली आहे.
पावसाळ्यात या नाल्याला पाणी आल्यावर दोन्ही गावांचा संपर्क पूर्णपणे तुटतो. वैद्यकीय आणीबाणी किंवा दैनंदिन कामांसाठी जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागतो. या भागाची बिकट अवस्था पाहता, संबंधित प्रशासन व शाशन विभागाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष द्यावे आणि रस्ता व पुलाचे काम त्वरित मंजूर करून ग्रामस्थांची या नरकयातनेतून सुटका करावी, अशी आग्रही विनंती दोन्ही गावातील नागरिकांकडून केली जात आहे.
