🇮🇳 अगस्त क्रांति दिन एवं विश्व आदिवासी दिन की हार्दिक शुभकामनाएँ
स्वातंत्र्य संग्रामाच्या वीरांना नमन, आदिवासी समाजाच्या संस्कृती व संघर्षाला सलाम!ऐ
प्रतिनिधी |
९ ऑगस्ट हा भारताच्या इतिहासातील अत्यंत प्रेरणादायी दिवस आहे. ९ ऑगस्ट १९४२ रोजी सुरू झालेल्या ‘भारत छोडो आंदोलनाची’ आठवण म्हणून अगस्त क्रांति दिवस साजरा केला जातो. देशाच्या स्वातंत्र्यासाठी असंख्य स्वातंत्र्यसैनिकांनी केलेला त्याग, संघर्ष आणि बलिदान आजही प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देतो. “करेंगे या मरेंगे” या निर्धारातून उभ्या राहिलेल्या या आंदोलनाने स्वातंत्र्यलढ्याला निर्णायक दिशा दिली.
याच दिवशी जगभरात विश्व आदिवासी दिवस साजरा केला जातो. आदिवासी समाजाची समृद्ध संस्कृती, परंपरा, जल-जंगल-जमिनीशी असलेले नाते, लोककला आणि सामाजिक योगदान यांचा सन्मान करण्याचा हा दिवस आहे. आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी, शिक्षणासाठी, आरोग्यासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने काम करण्याचा संकल्प करण्याचा हा दिवस आहे.
अगस्त क्रांति दिवस आपल्याला स्वातंत्र्य, लोकशाही आणि देशभक्तीची प्रेरणा देतो, तर विश्व आदिवासी दिवस आपल्याला समानता, सामाजिक न्याय आणि आदिवासी समाजाच्या अस्मितेचे महत्त्व अधोरेखित करून देतो.
या पावन दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व अहेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम, राष्ट्रवादी काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष तनुश्री धर्मराव बाबा आत्राम तसेच राष्ट्रवादी काँग्रेस महिला जिल्हा कार्याध्यक्ष सारिका गडपल्लीवार यांच्या वतीने सर्व नागरिकांना अगस्त क्रांति दिवस व विश्व आदिवासी दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
“स्वातंत्र्याच्या लढ्यातील वीरांचा त्याग सदैव स्मरणात राहो,
आदिवासी समाजाची संस्कृती, अस्मिता आणि परंपरा सदैव बहरत राहो!”
जय हिंद! 🇮🇳 | जय आदिवासी! 🌿 | जय महाराष्ट्र!
