उत्सवाचा जल्लोष! अबनपल्लीत पोचम्मा व भुलक्ष्मी देवीचा बोनालु उत्सव मोठ्या भक्तिभावात संपन्न
गडचिरोली (प्रतिनिधी : सालय्या कंबलवार)
अहेरी तालुक्यातील व्येंकटरावपेठ ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या वार्ड क्र. १, मौजा अबनपल्ली येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही पारंपरिक पोचम्मा व भुलक्ष्मी देवीचा बोनालु उत्सव अत्यंत भक्तिमय व उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला.
उत्सवाच्या सुरुवातीला प्राणहिता नदीच्या पात्रात पोचम्मा व भुलक्ष्मी देवींच्या मूर्तींचे मंगलस्नान विधिवत पार पडले. यावेळी उपस्थित सर्व भाविकांनी कोणतीही घाई-गडबड किंवा गर्दी न करता अत्यंत शिस्तबद्ध रीतीने धार्मिक विधी पार पाडले. मंगलस्नानानंतर पारंपरिक रीतीरिवाजानुसार पूजा-अर्चा करून अबनपल्ली येथील मंदिरात दोन्ही देवींची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली.
या धार्मिक सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी व्येंकटरावपेठ ग्रामपंचायतीचे सदस्य महेशकुमार, अमित सडमेक, मुत्ता कुमरम, शिवराम कुमरम, केशव सडमेक, विनोद सडमेक, अनिल आत्राम, सत्यनारायण गर्गम, राजेश गर्गम, राजू गर्गम, विष्णू आत्राम, अंकुश कुमरम आणि पुनेश मडावी यांच्यासह स्थानिक महिला बचत गटांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम व सहकार्य घेतले.
या बोनालु उत्सवात अबनपल्ली आणि परिसरातील महिला, पुरुष, युवक-युवती तसेच ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. नागरिकांच्या या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण गावात व परिसरात मंगलमय आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, लोकसंस्कृतीची जपवणूक करणाऱ्या या पारंपरिक उत्सवाची शोभा द्विगुणित झाली
