गडचिरोली प्रतिनिधी – सालय्या कंबलवार
वाढदिवसाचा गाजावाजा न करता सुमित भाऊ मोतकुरवार यांनी केले रक्तदान
अहेरी येथील रहिवासी तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व विद्यमान सिनेट सदस्य भाग्यश्री ताई आत्राम (हलगेकर) यांचे कट्टर समर्थक आणि सामाजिक कार्यकर्ते सुमित भाऊ मोतकुरवार यांनी आपल्या वाढदिवसाला सामाजिक बांधिलकी जपत अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला.
वाढदिवसाचा कोणताही गाजावाजा न करता सकाळी आई-वडिलांचे आशीर्वाद घेतल्यानंतर मंदिरात दर्शन घेऊन त्यांनी थेट जिल्हा उपरुग्णालय, अहेरी येथे जाऊन रक्तदान केले. “रक्तदान हे श्रेष्ठदान” या भावनेतून वाढदिवसाचे औचित्य साधत त्यांनी स्वतः रक्तदान करून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला.
यावेळी सुमित भाऊ मोतकुरवार यांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणाऱ्या सर्व मित्र-परिवाराचे आभार मानत, “आपत्कालीन प्रसंगी गरजू रुग्णांना रक्ताची आवश्यकता भासल्यास प्रत्येकाने रक्तदान करण्यासाठी सदैव तत्पर राहावे,” असे आवाहन केले.
वाढदिवसाच्या निमित्ताने अनावश्यक खर्च व दिखावा न करता रक्तदानासारखे समाजोपयोगी कार्य केल्याबद्दल सुमित भाऊ मोतकुरवार यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
