निवेदनाची तत्काळ दखल; पद्माताई बोगेंनी स्वतः उभे राहून कामाची पाहणी केली
ईद-ए-मिलादुन्नबीच्या जुलूस व बाइक रॅलीच्या पार्श्वभूमीवर जुलूस मार्गावरील खड्डे बुजविण्याची मागणी करण्यात आल्यानंतर नगरपंचायत अध्यक्षा पद्माताई सतीश बोगे यांनी निवेदनाची तातडीने दखल घेत खड्डे बुजविण्याची कार्यवाही सुरू केली. विशेष म्हणजे, काम केवळ कर्मचाऱ्यांवर सोपवून न थांबता पद्माताई बोगे यांनी स्वतः घटनास्थळी उभे राहून सुरू असलेल्या कामाची पाहणी केली.
नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेऊन त्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. जुलूस व बाइक रॅलीदरम्यान नागरिकांना तसेच युवकांना कोणतीही अडचण अथवा अपघाताचा धोका निर्माण होऊ नये, यासाठी रस्त्यावरील खड्डे व्यवस्थित बुजविण्याच्या कामावर त्यांनी स्वतः लक्ष ठेवले.
निवेदनाची दखल, तातडीने कार्यवाही आणि प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी या त्रिसूत्रीमुळे नगराध्यक्ष पद्माताई सतीश बोगे यांच्या कार्यतत्परतेचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.
महिला नगराध्यक्ष म्हणून पद्माताई बोगे यांनी नागरिकांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहत “फक्त आश्वासन नाही, तर प्रत्यक्ष कृती” याचा प्रत्यय दिल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. सार्वजनिक उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत स्वतः उभे राहून कामाची पाहणी केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
