पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी गडचिरोलीत वरिष्ठ नेत्यांची बैठक
गडचिरोली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. शशिकांतजी शिंदे आणि महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री मा. अनिलजी देशमुख यांनी गडचिरोली येथे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मा. सौ. भाग्यश्रीताई आत्राम यांच्या निवासस्थानी भेट देऊन पक्षाच्या संघटनात्मक बाबींवर सविस्तर चर्चा केली.
यावेळी मा. सौ. भाग्यश्रीताई आत्राम यांनी शाल व श्रीफळ देऊन मान्यवरांचे स्वागत केले. नागपूर विभागीय महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा तथा राष्ट्रीय कार्यकारिणी समितीच्या सदस्या मा. सौ. शाहीनताई हकीम यांनीही उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.
बैठकीत प्रदेशाध्यक्ष शशिकांतजी शिंदे यांनी पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकजुटीने आणि नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याचे आवाहन केले. अहेरी विधानसभा क्षेत्रातील विविध विकासकामे, जनतेचे प्रलंबित प्रश्न, आदिवासीबहुल भागातील समस्या तसेच गडचिरोली जिल्ह्यातील पक्ष संघटन मजबूत करण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली.
तसेच आदरणीय पवार साहेबांची पुरोगामी विचारधारा गडचिरोली जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचवून अधिकाधिक नागरिकांना पक्षाच्या विचारधारेशी जोडण्यासाठी तळागाळात संघटनात्मक प्रयत्न वाढविण्याबाबत यावेळी चर्चा झाली.
आगामी काळातील पक्षाचे नियोजन, संघटनात्मक जबाबदाऱ्या आणि स्थानिक पातळीवरील विविध महत्त्वपूर्ण विषयांवरही सविस्तर विचारविनिमय करण्यात आला. पक्ष संघटना अधिक मजबूत करून तळागाळापर्यंत पक्षाचा विचार पोहोचविण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
बैठकीस श्यामजी धाईत, हरिश्चंद्रजी बोरकुटे, इंद्रपालजी गेडाम (सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष), अहेरी तालुकाध्यक्ष श्रीनिवासजी विरगोनवार, अहेरी नगरपरिषदेचे नगरसेवक अमोलजी मुक्कावार, नगरसेविका संजना मडावी, महिला जिल्हाध्यक्ष प्रमिला रामटेके, सरचिटणीस सविता चव्हाण, सरपंच लगाम दीपकजी मडावी, माजी सरपंच शांतिग्राम सुशिलजी खराती, उपसरपंच येल्ला दिवाकरजी उराडे, नरेशजी राऊत, संजयजी कोचे, आकाश पगाडे, विष्णुजी रॉय, स्वप्निलजी श्रीरामवार, विज्जूजी रंगूवार, समीरजी अरिगेला, दादाभाई, सुभाषजी आत्राम, जम्पन्ना कंबागोनी, राजेशजी बद्दी, सुमितजी मोतकूरवार, प्रभाकरजी कुसराम, राजूभाऊ नसपुरवार, रवीभाऊ पेद्दल यांच्यासह विविध स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
