आलापल्लीत मांताई मंदिर सभागृहाचे हर्षोल्हासात लोकार्पण; युवा नेते हर्षवर्धनबाबा आत्राम यांच्या हस्ते उद्घाटन
आलापल्ली: तिरुपति मडावी
येथील गोंडमोहल्ला परिसरातील श्रद्धास्थान असलेल्या प्रसिद्ध मांताई मंदिर सभागृहाचा भव्य लोकार्पण सोहळा माजी पंचायत समिती सदस्य तथा युवा नेते हर्षवर्धनबाबा आत्राम यांच्या शुभहस्ते अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला. या नवीन सभागृहामुळे भाविकांसह स्थानिक नागरिकांना विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांसाठी एक हक्काची सुविधा उपलब्ध झाली आहे.
मांताई मंदिरात दरवर्षी पारंपरिक बोनालू उत्सव अत्यंत धुमधडाक्यात साजरा केला जातो. या उत्सवानिमित्त परिसरासह दूरवरच्या भागांतून हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी आलापल्लीत दाखल होतात. वाढत्या भाविकांची संख्या लक्षात घेता त्यांना विविध सुविधा मिळाव्यात, तसेच सार्वजनिक व धार्मिक कार्यक्रमांसाठी योग्य जागा उपलब्ध व्हावी, यासाठी अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा माजी कॅबिनेट मंत्री डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून या सभागृहाच्या बांधकामासाठी निधी मंजूर केला होता.
सभागृहाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर आयोजित या लोकार्पण सोहळ्यास स्थानिक लोकप्रतिनिधी, नागरिक व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रमुख उपस्थिती:
पुजारी व लोकप्रतिनिधी: मंदिराच्या पुजारिन निर्मलाताई कोरेत, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा महासचिव कैलाश कोरेत, येरमनारचे माजी सरपंच बालाजी गावडे, ग्रामपंचायत सदस्य संतोष अर्का, मायाताई कोरेत, सलीम शेख, माजी पेसा अध्यक्ष स्वामी वेलादी.
प्रतिष्ठित नागरिक व मान्यवर: रावजी नैताम, चंद्रकांत बेझलवार, नानाजी सोयाम, बाबुराव कोरेत, रघुपती सिडाम, वासुदेव आलाम, मनोज सडमेक, उमेश आत्राम, सुनील कुमरे, सुधाकर कोरेत, मधुकर मेश्राम, प्रकाश कोरेत.
महिला प्रतिनिधी: सुगंधा कुळमेथे, ताराबाई मडावी, सुशीला कोरेत, इंदिरा सडमेक, कमला कोरेत, रुक्माबाई मडावी, विनंती नैताम, अर्चना कोरेत व इतर नागरिक.
या सभागृहाच्या निर्मितीमुळे गोंडमोहल्ला परिसरातील नागरिकांनी व मंदिर समितीने आत्राम कुटुंबाचे मनापासून आभार मानले आहेत.
