जिवनगट्ट्यात नरोटे परिवाराचा सामूहिक रक्षाबंधन सोहळा उत्साहात
बहिण-भावाच्या प्रेमाचा पवित्र धागा एकत्र बांधत जपली कुटुंबीयांची एकजूट; पारंपरिक सणाला मिळाले कौटुंबिक ऐक्याचे स्वरूप
जिवनगट्टा, ता. एटापल्ली | प्रतिनिधी गिरीश नरोटे
एटापल्ली तालुक्यातील मौजा जिवनगट्टा येथे नरोटे परिवाराच्या वतीने रक्षाबंधनानिमित्त सामूहिक रक्षाबंधन कार्यक्रम मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात पार पडला. नरोटे परिवार मोठा व एकत्रित परिवार असल्याने यंदा सर्व बहिणी-भावांनी एकत्र येत रक्षाबंधनाचा सण सामूहिक पद्धतीने साजरा केला.
रक्षाबंधन हा केवळ राखी बांधण्याचा सण नसून बहिण-भावाच्या प्रेमाचा, विश्वासाचा, जिव्हाळ्याचा आणि आयुष्यभर एकमेकांच्या पाठीशी उभे राहण्याचा पवित्र बंध मानला जातो. याच भावनेतून नरोटे परिवारातील बहिणींनी आपल्या भावांच्या मनगटावर प्रेम, आपुलकी आणि संरक्षणाचे प्रतीक असलेली राखी बांधली. भावांनीही बहिणींच्या सुख-दुःखात सदैव साथ देण्याचा संकल्प व्यक्त केला.
या सामूहिक सोहळ्यामुळे कुटुंबातील नात्यांमधील प्रेम, जिव्हाळा आणि एकजूट अधिक दृढ झाली. धावपळीच्या आधुनिक जीवनात कुटुंबातील सदस्यांनी एकत्र येऊन पारंपरिक सण साजरा करण्याची ही परंपरा समाजासाठीही प्रेरणादायी ठरली.
कार्यक्रमाला कुमारी किट्टू, कुमारी चुटकी, कुमारी प्रगती, कुमारी प्राची, कुमारी माधुरी, कुमारी काजल, कुमारी सपना, सौ. प्रीती, कुमार गट्टू, डुग्गु, तन्मय, प्रणव, रितिक, बुल्लू, कुमारी मंजुषा, ममता, तनिषा, सौ. पुनम ताई, सौ. चंद्रकला ताई, सौ. पपीता ताई, श्री. नंदू भाऊ, सुधाकर भाऊ, बंडू भाऊ, चंपत भाऊ, रविभाऊ, रामभाऊ, लक्ष्मण भाऊ, गिरीश भाऊ, संतोष भाऊ, भारत भाऊ, सौ. शेवंता ताई, सौ. सुनिता ताई, सौ. संगीता ताई, सौ. बेबी ताई, सौ. मंगला ताई, सौ. कमल ताई यांच्यासह समस्त नरोटे परिवारातील सदस्य उपस्थित होते.
प्रेम, विश्वास आणि संस्कारांचा उत्सव
रक्षाबंधनाच्या निमित्ताने एकत्र आलेल्या नरोटे परिवाराने “कुटुंब मोठे असले तरी मनाने एकत्र राहणे हीच खरी ताकद” हा संदेश दिला. बहिण-भावाच्या नात्यातील प्रेमाचा धागा अधिक घट्ट करत हा सामूहिक रक्षाबंधन सोहळा आनंदात साजरा करण्यात आला.
