गणेश मंडळांना युवा नेते कौशिक भाऊ बोगे यांची सदिच्छा बाल गणेश मंडळात गणरायाचे दर्शन; सिरोंचावासीयांच्या सुख-समृद्धीसाठी केली मनोभावे प्रार्थना
सिरोंचा : गणेशोत्सवाच्या भक्तिमय वातावरणात शहरातील विविध गणेश मंडळांना भेट देत सामाजिक, धार्मिक आणि सार्वजनिक उपक्रमांना प्रोत्साहन देण्याचा उपक्रम सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर नगरसेवक सतीश भाऊ बोगे तसेच पद्माताई बोगे यांचे सुपुत्र, युवा नेता व समाजसेवक कौशिक भाऊ बोगे यांनी सिरोंचा छोटा बाजार परिसरातील बाल गणेश मंडळ तसेच बाल गणेश मंडळ, सिरोंचा येथे सदिच्छा भेट दिली.
यावेळी कौशिक भाऊ बोगे यांनी गणरायाचे मनोभावे दर्शन घेत विधिवत पूजा-अर्चना केली. गणेशोत्सवाच्या निमित्ताने मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी व कार्यकर्त्यांशी संवाद साधत मंडळाच्या उपक्रमांची माहिती जाणून घेतली. यावेळी उपस्थित भक्तगण व नागरिकांमध्येही उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
सिरोंचा शहरातील नागरिकांमध्ये सामाजिक बांधिलकी, एकोपा, शांतता आणि सौहार्द कायम राहावे, तसेच प्रत्येक कुटुंबात सुख-समृद्धी, आरोग्य व आनंद नांदावा, यासाठी गणरायाच्या चरणी प्रार्थना करण्यात आली.
गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता सामाजिक एकोपा, बंधुभाव आणि समाजसेवेचा संदेश देणारा उत्सव ठरावा, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या नियोजनाचे व उत्सवातील सहभागाचे कौतुकही करण्यात आले.
कौशिक भाऊ बोगे यांच्या सदिच्छा भेटीमुळे मंडळातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. नागरिकांशी आपुलकीने संवाद साधत त्यांनी गणेशोत्सवाच्या शुभेच्छाही दिल्या.
यावेळी नगरसेवक सतीश भाऊ बोगे, पद्माताई बोगे यांचे सुपुत्र युवा नेता व समाजसेवक कौशिक भाऊ बोगे यांच्या उपस्थितीने गणेश मंडळ परिसरातील भक्तिमय वातावरणाला विशेष रंगत आली.
“गणरायाच्या आशीर्वादाने सिरोंचावासीयांच्या जीवनात सुख, समृद्धी, शांतता आणि प्रगती नांदो,” अशी मनोभावे प्रार्थना यावेळी करण्यात आली.
