१०५ वर्षांचे प्रदीर्घ आणि समृद्ध आयुष्य जगलेल्या सौ. पोवरी बंडू गावडे यांचे निधन; आदिवासी जीवनशैलीचे प्रतीक हरवले
तालुका प्रतिनिधी : गिरीष डी. नरोटे
एटापल्ली (गडचिरोली):
एटापल्ली तालुक्यातील नागुलवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. नेवलुजी गावडे (रा. मौजा मोहली) यांच्या मातोश्री सौ. पोवरी बंडू गावडे यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले आहे. मृत्यूसमयी त्यांचे वय अंदाजे १०५ वर्षे होते. त्यांनी आपल्या आयुष्यात तीन पिढ्यांचा आनंद प्रत्यक्ष डोळ्यांसमोर पाहिला.
कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, सौ. पोवरी गावडे यांनी आपल्या मुलाचा मुलगा (नातू) आणि त्याच्याही मुलाला (पणतू) पाळण्यात खेळवत आणि झुलवत तीन पिढ्यांचा विस्तार पाहिला. त्यांचे पुत्र श्री. नेवलुजी गावडे, नातू श्री. अंकुश नेवलुजी गावडे आणि पणतू लहान दादू अशा तीनही पिढ्यांना त्यांनी अत्यंत प्रेमाने सांभाळले.
सेंद्रिय जीवनशैली आणि दीर्घायुष्याचे रहस्य
पूर्वीच्या काळात आदिवासी समाज निसर्गाच्या कुशीत राहून जंगलातील कंदमुळे, जंगली मटारू, रानभाज्या, टोरीचे शुद्ध तेल आणि हाताने सडलेला तांदूळ, ज्वारी, बाजरी, मका यांपासून बनवलेली आंबील पानांच्या डोप्याने पित असत. कोणत्याही रासायनिक खतांचा किंवा कीटकनाशकांचा वापर न करता पूर्णपणे जैविक (ऑर्गॅनिक) पद्धतीने पिकवलेले अन्न खाल्ल्यामुळेच त्यांनी १०० वर्षांपेक्षा अधिक निरोगी आयुष्य घालवले, असे मत स्थानिक नागरिकांनी व कुटुंबीयांनी व्यक्त केले.
आजच्या आधुनिक युगात रासायनिक खते आणि पेस्टिसाईड्सयुक्त अन्नपदार्थांमुळे मानवी आयुष्य घटत चालले असताना, सौ. पोवरी गावडे यांचे प्रदीर्घ आयुष्य हे जुन्या काळातील शुद्ध, निसर्गपूरक आणि सेंद्रिय जीवनशैलीचे जिवंत उदाहरण ठरले आहे. त्यांच्या निधनाने मोहली परिसरात शोककळा पसरली असून गावकऱ्यांकडून तीव्र दुखः व्यक्त केले जात
