सिरोंचात राजकीय व सामाजिक आदरांजली! श्री राम सेना गणेश मंडळात नगराध्यक्षा पद्माताई बोगे व सतीश भाऊ बोगे यांची धडाकेबाज भेट
गणरायाची महाआरती उपस्थिति सामाजिक सलोख्याचा संदेश; मंडळाला दिली रोख देणगी!
सिरोंचा
गणेशोत्सवाच्या भक्तिमय आणि प्रचंड उत्साही वातावरणात सिरोंचा येथील प्रसिद्ध ‘श्री राम सेना गणेश मंडळा’च्या मंडपात शहराच्या प्रथम नागरिक, नगराध्यक्षा सौ. पद्माताई सतीश बोगे आणि ज्येष्ठ नगरसेवक सतीश भाऊ बोगे यांनी सदिच्छा भेट देऊन श्री गणरायाचे भव्य दर्शन घेतले. यावेळी लोकप्रतिनिधींच्या हस्ते श्री गणरायाची भावपूर्ण महाआरती करण्यात आली व सिरोंचावासीयांच्या सुख, शांती, आरोग्य आणि उज्वल भवितव्यासाठी गणरायाच्या चरणी प्रार्थना करण्यात आली.
प्रचंड उत्साह!
पद्माताई बोगे व सतीश भाऊ बोगे यांचे मंडपात आगमन होताच सिरोंचा शहराध्यक्ष रवी सुलतान यांच्या नेतृत्वाखाली मंडळाच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी त्यांचे अभूतपूर्व व जंगी स्वागत केले. संपूर्ण मंडप परिसर कार्यकर्त्यांच्या उत्साहाने दुमदुमून गेला होता.
सामाजिक बांधिलकीचे कौतुक; दिली रोख देणगी!
याप्रसंगी नगराध्यक्षा पद्माताई बोगे व सतीश भाऊ बोगे यांनी श्री राम सेना गणेश मंडळाच्या वतीने राबवल्या जाणाऱ्या विविध सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक उपक्रमांचे मनापासून कौतुक केले. मंडळाच्या सामाजिक कार्याला बळ देण्यासाठी त्यांनी मंडळाला रोख देणगी सुपूर्द केली.
तसेच, तरुण कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सतीश भाऊ बोगे म्हणाले, “गणेशोत्सव हा केवळ धार्मिक सण नसून सामाजिक एकोपा, सलोखा आणि परस्पर बंधुभाव वाढवण्याचे एक सशक्त माध्यम आहे. सिरोंचा शहराची सामाजिक एकतेची उज्ज्वल परंपरा जपण्याचे काम श्री राम सेना गणेश मंडळ करत आहे.”
गणेशभक्तांची अलोट गर्दी व प्रमुख उपस्थिती
या सोहळ्याला श्री राम सेना गणेश मंडळाचे साईकिरण बोगे, संदीप गांठ, सुजल कमलवार, राहुल कोल्लूरी यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी, निष्ठावंत कार्यकर्ते, महिला भगिनी, परिसरातील नागरिक आणि गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकप्रतिनिधींच्या या धडाकेबाज भेटीमुळे आणि आश्वासक संवादामुळे मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवा जोश आणि नवा उत्साह पाहायला मिळाला.
सिरोंचा में श्रीराम सेना गणेश मंडल को पदमाताई बोगे व सतीश भाऊ बोगे की सदिच्छा उपस्थिति सौंपी नकद धनराशि
सिरोंचा (विशेष प्रतिनिधि):
गणेशोत्सव के अत्यंत उत्साहपूर्ण माहौल में सिरोंचा स्थित प्रसिद्ध ‘श्री राम सेना गणेश मंडल’ के मंडप में सिरोंचा की नगर माहापौर सौ. पदमाताई सतीश बोगे एवं वरिष्ठ नगरसेवक सतीश भाऊ बोगे ने गरिमामयी उपस्थिति दर्ज कराई। इस अवसर पर उन्होंने श्री गणराया का दर्शन कर भक्तिभाव से महाआरती संपन्न की तथा समस्त नगरवासियों के सुख, शांति, समृद्धि एवं स्वास्थ्य के लिए भगवान श्री गणेश के चरणों में प्रार्थना की।
कार्यकर्ताओं का भव्य स्वागत
नगर अध्यक्षा पदमाताई बोगे एवं सतीश भाऊ बोगे का मंडप में आगमन होते ही सिरोंचा शहराध्यक्ष रवि सुल्तान के नेतृत्व में मंडल के पदाधिकारियों एवं कार्यकर्ताओं ने उनका भव्य एवं आत्मीय स्वागत किया।
सामाजिक कार्यों की सराहना एवं आर्थिक सहयोग
नगर अध्यक्षा पदमाताई बोगे और सतीश भाऊ बोगे ने श्री राम सेना गणेश मंडल द्वारा आयोजित किए जाने वाले विभिन्न सामाजिक, सांस्कृतिक एवं धार्मिक कार्यक्रमों की भूरी-भूरी प्रशंसा की। मंडल के सामाजिक दायित्वों और गतिविधियों को संबल प्रदान करने हेतु उन्होंने नकद धनराशि दान स्वरूप प्रदान की।
इस दौरान कार्यकर्ताओं से संवाद करते हुए उन्होंने कहा कि गणेशोत्सव केवल एक धार्मिक पर्व नहीं, बल्कि सामाजिक एकता, सद्भाव और आपसी भाईचारे को सुदृढ़ करने का एक सशक्त माध्यम है। सिरोंचा शहर की गौरवशाली सामाजिक परंपरा को बनाए रखने में गणेश मंडलों की भूमिका अत्यंत सराहनीय है।
प्रमुख उपस्थिति
इस गरिमामयी अवसर पर श्री राम सेना गणेश मंडल के साईकिरण बोगे, संदीप गंठा, सुजल कमलवार, राहुल कोल्लूरी सहित मंडल के सभी प्रमुख पदाधिकारी, निष्ठावान कार्यकर्ता, नागरिक एवं गणेश भक्त बड़ी संख्या में उपस्थित थे। जन प्रतिनिधियों की इस भेंट से मंडल के कार्यकर्ताओं में अपार उत्साह और ऊर्जा का संचार देखा गया।
क
