टायगर ग्रुपच्या गणेशोत्सवात भक्तिमय वातावरण
हर्षवर्धन बाबा आत्राम व डॉ. मिताली ताई आत्राम यांच्या हस्ते श्री गणरायाची पूजा व आरती
आलापल्ली येथील टायगर ग्रुप गणेश मंडळाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त भक्तिमय वातावरणात विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी हर्षवर्धन बाबा आत्राम व डॉ. मिताली ताई आत्राम यांच्या हस्ते श्री गणरायाची मनोभावे पूजा व आरती करण्यात आली.
पूजा व आरतीनंतर उपस्थित गणेशभक्तांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. यावेळी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री गणरायाचे दर्शन घेतले.
दरम्यान, ‘आदिवासी रूट्स अँड रेसिपीज’ या प्रदर्शनाच्या स्टॉललाही हर्षवर्धन बाबा आत्राम व डॉ. मिताली ताई आत्राम यांनी भेट दिली. या ठिकाणी मांडण्यात आलेल्या विविध पारंपरिक आदिवासी खाद्यपदार्थांची त्यांनी पाहणी केली.
या कार्यक्रमाला अहेरी विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येरावार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नागेश मडावी, सुरेंद्र अलोणे, कैलास कोरेत, बालाजी गावडे, सोमेश्वर रामटेके, सलीम शेख, आफ्रिदी सैय्यद यांच्यासह टायगर ग्रुपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि गणेशभक्त उपस्थित होते.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने धार्मिक श्रद्धेसोबतच पारंपरिक खाद्यसंस्कृतीला व्यासपीठ मिळाल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
