*पुसुकपल्ली येथे नवं युवक गणेश मंडळाच्या महाप्रसादाला हर्षवर्धन बाबा आत्राम यांची उपस्थिती….!!!!*
प्रतिनिधि तिरुपति मडावी
अहेरी तालुका अंतर्गत येत असलेल्या मौजा पुसुकपल्ली येथे *नवं युवक गणेश मंडळाच्या* वतीने आयोजित महाप्रसाद कार्यक्रमाला *युवा नेते हर्षवर्धन बाबा आत्राम* यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी श्री गणरायाची विधिवत पूजा-अर्चना करून दर्शन घेतले.
गणेशोत्सवानिमित्त आयोजित या कार्यक्रमामुळे पुसुकपल्ली परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. महाप्रसादाच्या कार्यक्रमाला परिसरातील नागरिक, गणेशभक्त तसेच मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी अहेरी तालुका अध्यक्ष नागेश मडावी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राकेश कुडमेथे, तसेच श्रीनिवास भोयर, सूरज भोयर, मुकेश भोयर, अमर कत्रेलवार, हरीश केरकर, आदेश केरकर, चिरंजीव डोके, चिंटू भोयर, साई डोके, जयप्रकाश भोयर, नागेश येलूर, रमेश येलूर, अरुण कात्रेलवार, गणेश पोरतेट, आकाश तोराम यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
महाप्रसाद कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित भाविकांनी श्री गणरायाचे दर्शन घेतले. मंडळाच्या वतीने करण्यात आलेल्या आयोजनाचे उपस्थितांनी कौतुक केले.
