ग्रामपंचायत कर्मचारी दिपक चौधरी यांच्या प्रकृतीची हर्षवर्धन बाबा आत्राम यांनी घेतली विचारपूस…!!*_
पुसुकपल्ली येथे ग्रामपंचायत कर्मचारी *दिपक चौधरी* यांची अचानक प्रकृती बिघडल्याची माहिती मिळताच *युवा नेते हर्षवर्धन बाबा आत्राम* यांनी त्यांच्या राहत्या घरी भेट देत प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी त्यांनी चौधरी यांच्या तब्येतीची माहिती जाणून घेत त्यांना लवकरात लवकर प्रकृती सुधारावी, अशा शुभेच्छा दिल्या.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अहेरी तालुका अध्यक्ष नागेश मडावी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राकेश कुडमेथे, चौधरी परिवारातील सदस्य तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.
