जारावंडी येथे अतिक्रमणधारक शेतकऱ्यांसाठी उद्या विशेष सभेचे आयोजन; उपविभागीय अधिकाऱ्यांच्या बैठकीतील निर्णयांवर होणार चर्चा
जारावंडी (गडचिरोली) : गिरीश नरोटे
जारावंडी ईलाक्यातील सर्व अतिक्रमणधारक शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. दिनांक २१ सप्टेंबर २०२६ रोजी मा. उपविभागीय अधिकारी (SDO), एटापल्ली यांच्या कार्यालयात पार पडलेल्या सभेतील महत्त्वपूर्ण निर्णय आणि अतिक्रमण दावे दाखल करण्यासंदर्भातील सविस्तर माहिती देण्यासाठी उद्या, गुरुवार, दिनांक २४ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता ग्रामपंचायत कार्यालय जारावंडी येथे विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
या सभेमध्ये मा. उपविभागीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत झालेली चर्चा, अतिक्रमण नियमानुकूल करणे, दाव्यांची प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रांची माहिती उपस्थित शेतकऱ्यांना दिली जाणार आहे.
तरी जारावंडी ईलाक्यातील सर्व अतिक्रमणधारक शेतकरी बांधकांनी या सभेला वेळेवर उपस्थित राहून माहिती जाणून घ्यावी व प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
सभेचा सविस्तर तपशील :
दिनांक : २४ सप्टेंबर २०२६ (रोज गुरुवार)
वेळ : सकाळी ११:०० वाजता
ठिकाण : ग्रामपंचायत कार्यालय, जारावंडी
