आल्लापल्ली येथे दिव्यांगांसाठी साहित्य निश्चितीकरण व मोजमाप शिबिर संपन्न; १४ विद्यार्थ्यांना लवकरच मिळणार मोफत साहित्य
आल्लापल्ली (गडचिरोली) :
स्थानिक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, आल्लापल्ली येथे बहुविकलांग, बौद्धिक अक्षमता, सीपी (Cerebral Palsy), अंध, अल्पदृष्टी आणि कर्णबधिर (CWSN) विद्यार्थ्यांसाठी विशेष साहित्य निश्चितीकरण व मोजमाप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरादरम्यान दोन दिव्यांग विद्यार्थ्यांना जागेवरच ‘कॅलीपर’ बसवून देण्यात आले. तसेच उर्वरित १४ दिव्यांग विद्यार्थ्यांची तपासणी करून त्यांच्या गरजेनुसार टीएलएम किट (TLM kit), व्हिलचेअर, रोलेटर, कॅलीपर आणि सीपी चेअर (CP Chair) इत्यादी साहित्याची निश्चिती करण्यात आली आहे. हे सर्व साहित्य विद्यार्थ्यांना लवकरच वितरीत केले जाणार आहे.
सदर शिबीर यशस्वी करण्यासाठी स्थानिक शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, केंद्रप्रमुख, सर्व साधनव्यक्ती (Resource Persons) आणि विशेष शिक्षकांनी मोलाचे योगदान दिले.
(तालुका प्रतिनिधी : गिरीश डी. नरोटे,
