कॅन्सरग्रस्त तुर्जाबाई मडावी यांना हर्षवर्धन बाबा आत्राम यांचा मदतीचा हात
अहेरी : तालुक्यातील मौजा काटेपल्ली, पोस्ट देवलामारी येथील रहिवासी तुर्जाबाई तुलशीराम मडावी या कॅन्सरच्या आजाराने त्रस्त असून त्यांच्या उपचारासाठी मोठा खर्च होत आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांसमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत.
तुर्जाबाई मडावी यांच्या आजारपणाची माहिती मिळाल्यानंतर युवा नेते हर्षवर्धन बाबा आत्राम यांनी त्यांच्या उपचारासाठी आर्थिक मदतीचा हात पुढे केला. या मदतीमुळे उपचाराच्या काळात कुटुंबाला काही प्रमाणात आधार मिळाला आहे.
यावेळी विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येर्रावर तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थितांनी तुर्जाबाई मडावी यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस करून त्यांच्या लवकर प्रकृती सुधारण्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
गरजू आणि आर्थिक अडचणीत असलेल्या नागरिकांना मदतीचा आधार देण्याच्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.
