सुरजागड परिसरातिल विविध समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
सात गावांतील प्रस्तावित खननकामांना संवैधानिक विरोध; पारंपरिक महाग्रामसभेची ठाम भूमिका
एटापल्ली : सुरजागड परिपरिसरातिल विविध गावांच्या समस्या तसेच प्रस्तावित खननकामांच्या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी पारंपरिक महाग्रामसभा परिसर सुरजागडच्या पदाधिकारी व सदस्यांनी जिल्हाधिकारी, गडचिरोली यांना निवेदन सादर केले. सुरजागड परिसरातिल ७० गावांपैकी वेदमगड, नैनवाडी, वाटेली, जेवेली, मोस्डके, पुस्के आणि दमकोंदवाही या सात गावांतील प्रस्तावित खननकामांना संवैधानिक विरोध दर्शविण्यात आला असून, संबंधित खननकामे रद्द करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली.
स्थानिक ग्रामसभा व नागरिकांच्या संवैधानिक अधिकारांचा विचार करूनच या भागातील खननविषयक निर्णय घेण्यात यावेत, अशी भूमिका महाग्रामसभेने मांडली. तसेच ग्रामसभांना कोणत्याही प्रकारची दिशाभूल न करता त्यांच्या संवैधानिक अधिकारांची योग्य अंमलबजावणी करण्याची संधी देण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली.
सुरजागड परिसरातील सात गावांशी संबंधित खननविषयक समस्या तातडीने सोडवाव्यात आणि स्थानिक नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी प्रशासनाने आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
यावेळी पारंपरिक महाग्रामसभा इलाका सुरजागडच्या अध्यक्षा सौ. कल्पना आलाम, उपाध्यक्ष श्री. बंडू दोरपेटी, सचिव श्री. देवू हिचामी, जिल्हा महाग्रामसभा सदस्य श्री. पत्तू पोटावी, सदस्य श्री. लक्ष्मण जेट्टी, जिल्हा महाग्रामसभा सदस्य सौ. पूनम जेट्टी, इलाका महाग्रामसभा सल्लागार श्री. सम्मा जेट्टी, सदस्य श्री. रामलू गोटा व श्री. शंकर नवडी यांच्यासह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
सुरजागड परिसरातील तील ग्रामसभा आणि स्थानिक नागरिकांच्या संवैधानिक अधिकारांच्या संरक्षणासाठी एकजुटीने प्रयत्न सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
तालुका प्रतिनिधी : सुगत उराडे
दि. २५ सप्टेंबर २०२६
जय आदिवासी! ✊
जय जौहर! 🏹
