सुरजागड इलाक्यात ३० सप्टेंबरला ‘पारंपरिक महाग्रामसभा’ बैठकीचे आयोजन; सर्व ग्रामसभांचे अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन
सुरजागड:
पारंपरिक महाग्रामसभा इलाका सुरजागडच्या वतीने बुधवार, दिनांक ३० सप्टेंबर २०२६ रोजी विशेष महाग्रामसभा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीस सुरजागड इलाक्यातील सर्व ग्रामसभांचे पदाधिकारी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महाग्रामसभेकडून करण्यात आले आहे.
या महत्त्वपूर्ण बैठकीसाठी इलाक्यातील सर्व पेसा समिती अध्यक्ष, कोष समिती अध्यक्ष, वनहक्क समिती अध्यक्ष, रूढी-प्रथा ग्रामसभा अध्यक्ष, गावातील गायत्ता, भूमिया, शेहना, युवा-युवती, सरपंच, विविध क्षेत्रांतील कर्मचारी व इलाक्यातील सर्व सामान्य जनतेने आवर्जून उपस्थित राहावे.
महत्त्वाच्या सूचना:
उपस्थितीची अट: प्रत्येक ग्रामसभेतून कमीत कमी १५ ग्रामस्थांची उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे.
रूढीगत जोहार: ज्या ग्रामसभांचे मुख्य पदाधिकारी या बैठकीस अनुपस्थित राहतील, त्यांच्यावर पारंपरिक नियमांनुसार रूढीगत कारवाई (जोहार) करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा आयोजकांकडून देण्यात आला आहे.
सुरजागड इलाक्याच्या सामूहिक हितासाठी आणि पारंपरिक स्वायत्ततेच्या रक्षणासाठी सर्व नागरिकांनी न चुकता उपस्थित राहून आपले योगदान द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
जय आदिवासी! जय जोहार!
