मौजा जिवनगट्टा येथे जननायक भगवान बिरसा मुंडा यांची १५१ वी जयंती उत्साहात साजरी!
आदिवासी समाजाच्या क्रांती, संघर्ष आणि स्वाभिमानाचे प्रतीक असलेल्या धरती आबा बिरसा मुंडा यांना अभिवादन
गडचिरोली | एटापल्ली | तालुका प्रतिनिधी : गिरीष डी. नरोटे
एटापल्ली तालुक्यातील मौजा जिवनगट्टा येथे रविवार, दिनांक १५ नोव्हेंबर २०२६ रोजी आदिवासी समाजाचे महान क्रांतिकारक, जननायक तथा धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांची १५१ वी जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
यावेळी भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला अभिवादन करून त्यांच्या महान कार्याचे स्मरण करण्यात आले. ब्रिटिशांच्या अन्यायकारक राजवटीविरोधात त्यांनी दिलेला लढा, आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी केलेला संघर्ष आणि जल, जंगल, जमीन यांच्या संरक्षणासाठी उभारलेला ऐतिहासिक ‘उलगुलान’ आजही समाजाला प्रेरणा देणारा आहे.
भगवान बिरसा मुंडा यांनी आपल्या अल्प आयुष्यात आदिवासी समाजामध्ये स्वाभिमान, एकता आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची जिद्द निर्माण केली. त्यांचे विचार आणि क्रांतिकारी कार्य पुढील पिढ्यांसाठी सदैव प्रेरणादायी राहतील, असा संदेश यावेळी देण्यात आला.
मौजा जिवनगट्टा येथे जयंतीनिमित्त आदिवासी बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या विचारांचा वारसा जतन करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
जय बिरसा! जय जोहार! जय आदिवासी!
