रोपी येथे क्रांतिसूर्य शहीद भगवान बिरसा मुंडा यांची १५१ वी जयंती उत्साहात साजरी!
रोपबारसा व जारावंडी इलाका ग्रामसभांचा संयुक्त उपक्रम; पारंपरिक रेला-रिलो नृत्याने रंगला सोहळा, जल-जंगल-जमिनीच्या हक्कांचा जागर
एटापल्ली | प्रतिनिधी : सुगत उराडे
रोपी (ता. एटापल्ली) : आदिवासी समाजाच्या स्वाभिमानाचे, अस्मितेचे आणि क्रांतिकारी संघर्षाचे प्रतीक असलेले क्रांतिसूर्य शहीद भगवान बिरसा मुंडा यांची १५१ वी जयंती १५ नोव्हेंबर रोजी मौजा रोपी येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. रोपबारसा इलाका ग्रामसभा आणि जारावंडी इलाका ग्रामसभा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या जयंती महोत्सवात आदिवासी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. पारंपरिक वेशभूषा, रेला-रिलो नृत्य आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
