गोमासी कुटुंबाच्या आनंदसोहळ्यात बानय्या जनगाम यांची आवर्जून उपस्थिती!
सुख-दुःखात सर्वांशी आपुलकीचे नाते जपणारे बानय्या जनगाम; नूतन गृहप्रवेश व नामकरण सोहळ्यात दिल्या शुभेच्छा!
सिरोंचा : तालुक्यातील सिरकोंडा येथील गणपत गोमासी यांच्या नूतन गृहप्रवेश व नामकरण सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे गडचिरोली जिल्हा कार्यकारी अध्यक्ष बानय्या जनगाम यांनी आवर्जून उपस्थिती दर्शवून गोमासी कुटुंबीयांच्या आनंदात सहभाग नोंदविला.
गणपत गोमासी यांनी दिलेल्या निमंत्रणाचा मान राखत बानय्या जनगाम यांनी या मंगलमय सोहळ्याला उपस्थित राहून गोमासी कुटुंबीयांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी नूतन वास्तूच्या शुभारंभानिमित्त भेटवस्तू देऊन कुटुंबीयांचे अभिनंदन केले. तसेच नव्या घरात सुख, शांती, समृद्धी आणि भरभराट नांदो, अशा मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. नामकरण सोहळ्यानिमित्त चिमुकल्याला आशीर्वादही दिले.
सुख-दुःखात प्रत्येकाच्या पाठीशी उभे राहून सर्वांशी आपुलकीचे संबंध जपणारे नेतृत्व म्हणून बानय्या जनगाम यांची परिसरात ओळख आहे. राजकीय जबाबदारी सांभाळतानाच सामाजिक व कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन सर्वसामान्य नागरिकांशी जिव्हाळ्याचे नाते टिकविण्याचा त्यांचा प्रयत्न या उपस्थितीतून पुन्हा अधोरेखित झाला.
या आनंदमय सोहळ्याला सिरकोंडा येथील सरपंच लक्ष्मण गावडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सिरोंचा शहराध्यक्ष रवी सुलतान, भारत मडावी, दुर्गेश लंबाडी, सडवली कुम्मरी, डेव्हिड बंदरकंटी, सुरेश जाडी यांच्यासह सिरकोंडा परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी गोमासी कुटुंबीयांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.
