अहेरी, प्रतिनिधी : अहेरी नगरपंचायत प्रभाग क्रमांक ९राजनगरीत भाग्यश्रीताई आत्राम (हलगेकर) यांचे वर्चस्व कायम; दिग्गजांना धक्का, तुतारीचा दणदणीत विजय!Reporter:- Tirupati Madavi
अहेरी मधील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) अर्थात तुतारी चिन्हाच्या उमेदवार संजना हनुमंतू मडावी यांनी १९७ मते मिळवत दणदणीत विजय संपादन केला. या विजयाने अहेरीच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्रीताई आत्राम (हलगेकर) यांच्या नेतृत्वाची पुन्हा एकदा ताकद सिद्ध झाली आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, ही केवळ एका उमेदवाराची निवडणूक नव्हती, तर भाग्यश्रीताई आत्राम यांच्या नेतृत्वावरील जनतेच्या विश्वासाची परीक्षा होती. तळागाळातील सामान्य कार्यकर्ती असलेल्या संजना मडावी यांना उमेदवारी देत भाग्यश्रीताईंनी दाखविलेला विश्वास मतदारांनी विजयाच्या रूपाने सार्थ ठरविला.
“राजनगरीत लाडकी बहीणचा जादू चालला; दिग्गज मुह के बल गिरे!” अशी चर्चा आता सर्वत्र रंगू लागली आहे. अनेक राजकीय दिग्गजांच्या रणनीतींना छेद देत भाग्यश्रीताईंनी आपल्या नेतृत्वाखाली पक्षाचा झेंडा पुन्हा एकदा उंचावला आहे.
या निकालामुळे अहेरीतील राजकारणात भाग्यश्रीताई आत्राम (हलगेकर) यांचे वर्चस्व कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. महिला नेतृत्व, जनसंपर्क आणि कार्यकर्त्यांवरील विश्वास यामुळे त्यांनी जनतेच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे हा विजय केवळ संजना मडावी यांचाच नसून, भाग्यश्रीताईंच्या नेतृत्वाचा आणि जनतेच्या विश्वासाचा विजय मानला जात आहे.
विजयानंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी, घोषणाबाजी आणि जल्लोष करत आनंद व्यक्त केला. अहेरीच्या राजनगरीत तुतारीचा नाद घुमला असून, “एक महिला नेत्या आणि तिच्या नेतृत्वाने पुन्हा इतिहास घडवला” अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
