*प्रदेश कार्यालयीन टीमचा सिरोंचा दौरा, बूथ सशक्तीकरणावर विशेष भर*
दिनांक *24-06-2026* रोजी भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष *मा. श्री. रवींद्रजी चव्हाण* यांच्या कार्यालयीन टीमने *सिरोंचा तालुक्याचा* दौरा केला.
या दौऱ्यादरम्यान *बूथ प्रमुख व शक्तीकेंद्र प्रमुख* यांच्या *बूथ समितीची पडताळणी* करण्यात आली. तसेच पक्ष संघटनेत काम करत असताना कार्यकर्त्यांना येणाऱ्या *विविध अडचणी व समस्यांबाबत* सविस्तर चर्चा करण्यात आली.
प्रदेश कार्यालयाचे *श्री. संदीपजी वढेले* व *श्री. पृथ्वीराजजी पाटील* यांच्या नेतृत्वाखालील या टीमने कार्यकर्त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेत त्यांच्या सूचना व समस्या नोट केल्या. सर्व समस्या प्रदेश कार्यालयापर्यंत पोहोचवून *मा. रवींद्रजी चव्हाण प्रदेश अध्यक्ष* आणि *मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस* यांच्या माध्यमातून त्या समस्यांचे *निराकरण* करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन यावेळी देण्यात आले.
याप्रसंगी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष *श्री. शंकरभाऊ नरहरी*, ज्येष्ठ नेते *श्री. सत्यनारायण मंचालवार*, सिरोंचा मंडळाचे पदाधिकारी, सर्व बूथ प्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख व भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*बूथ मजबूत तर विजय निश्चित! संघटन हेच सामर्थ्य!*
