*उमेश गझलपेल्लीवार*
विशेष प्रतिनिधी गडचिरोली
*जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाच्या निमित्ताने गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने ‘ड्रग फ्री गडचिरोली’ मॅरेथॉनचे आयोजन*
. व्यसनमुक्त गडचिरोलीचा संदेश देण्यासाठी मॅरेथॉन मध्ये वरिष्ठ अधिका-यांसह 500 हून अधिक पोलीस अधिकारी/अंमलदार व विद्याथ्र्यांचा उत्स्फुर्त सहभाग
संयुक्त राष्ट्रसंघाने सन-1988 पासून 26 जून हा दिवस अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून घोषित केलेला आहे. तेव्हा पासून 26 जून हा दिवस अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो. समाजात अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी जनजागृती करणे आणि व्यसनमुक्त, निरोगी व सुरक्षित समाज निर्माण करण्यासाठी तसेच नागरिकांमध्ये आरोग्य स्वास्थ्य विषयक जागरुकता निर्माण व्हावी यासाठी जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाच्या पाश्र्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने ‘ड्रग फ्री गडचिरोली’ ¬मॅराथॉनचे आयोजन करण्यात आले होते.
आज दि. 26 जून 2026 रोजी पोलीस कवायत मैदान गडचिरोली ते महिला महाविद्यालय (लॅडमार्क हॉटेल)चौकपर्यंंत 5 कि. मी. मॅराथॉनचे आयोजन करण्यात येऊन मॅरेाथॉनमध्ये पोलीस अधीक्षक, गडचिरोली एम. रमेश, यांच्यासह इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच पोलीस अंमलदार यांनी मॅरेथॉन मध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या मॅरेथॉन समारोप शहिद पांडु आलाम सभागृह येथे करण्यात आला. सदर मॅरेथॉनमध्ये सहभागींना पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र प्रदान करण्यात येऊन सर्व सहभागींचे कौतूक करण्यात आले.
यावेळी आयोजीत कार्यक्रमामध्ये पोलीस अधीक्षक, गडचिरोली एम. रमेश यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, अंमली पदार्थाच्या दुष्परिणामांविषयी जनजागृती करणे आणि व्यसनमुक्त, निरोगी व सुरक्षित समाज निर्माण करण्याचा संदेश देण्यासाठी या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. व्यसन हे समाज आणि राष्ट्राच्या प्रगतीसाठी गंभीर आव्हान आहे. अंमली पदार्थाची तस्करी, विक्री आणि सेवन याविरुध्द कठोर कारवाई करण्यासोबतच जनजागृती आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने विशेष भर दिला जात आहे.
सदर कार्यक्रमाप्रसंगी पोलीस अधीक्षक, गडचिरोली एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधिरा, पोलीस उप-अधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे तसेच सर्व शाखांचे अधिकारी व अंमलदार उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शाखांचे अधिकारी व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.
