- दिनांक : 12 जुलै 2026 |
प्रतिनिधी:– तिरुपती मडावी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) एटापल्ली तालुक्यातील भव्य कार्यकर्ता बैठक उत्साहात संपन्न
एटापल्ली येथील भगवंतराव कला व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) यांच्या वतीने तालुकास्तरीय भव्य कार्यकर्ता बैठकीचे आयोजन करण्यात आले. पक्ष संघटना अधिक बळकट करणे, बूथ स्तरावर पक्षाची ताकद वाढविणे तसेच आगामी राजकीय कार्यक्रमांची दिशा निश्चित करण्यासाठी या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीला युवा नेते मा. हर्षवर्धनराव बाबा आत्राम (पंचायत समिती सदस्य, अहेरी) यांच्या अध्यक्षतेखाली मार्गदर्शन लाभले. तसेच डॉ. मिताली अक्का आत्राम, श्री. संभाजी हिचामी (तालुका अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), श्री. संजूभाऊ चारडूके (जिल्हा परिषद सदस्य), सौ. सपना ताई कोडापे, सौ. बाबीता मडावी, श्री. कोडपे सर, श्री. लक्ष्मण भाऊ नरोटी, श्री. सुगत भाऊ कुराडे, श्री. दामोदर नरोटे, श्री. सैनी पेक्का लेकामी, श्री. नामदेव लेकामी, सौ. पौर्णिमा श्रीरामवार, सौ. निर्मला हिचामी, सौ. सरिता गावडे, सौ. छाया उईके, श्री. अनिल करमरकर, श्री. अजय भाऊ पदा, श्री. संतोष भाऊ पदा, श्री. सुरेश लेकामी, श्री. विनोद पत्तीवार सर आणि श्री. गिरीष भाऊ नरोटी यांच्यासह तालुक्यातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे आजी-माजी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत पक्ष संघटन मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदान केंद्रावर सक्षम संघटन उभारण्याचे आवाहन करण्यात आले. उपस्थित कार्यकर्त्यांनी पक्षाच्या धोरणांना जनतेपर्यंत पोहोचवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक बळकट करण्याचा संकल्प व्यक्त केला.
एटापल्ली तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या या बैठकीस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याने पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला नवी ऊर्जा मिळाल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
