सीईओ सुहास गाडे यांचा सिरोंचा तालुक्याचा दौरा; बामणी ते झिगाणूर परिसरातील विकासकामांची पाहणी
सिरोंचा | प्रतिनिधी
गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी १७ जुलै रोजी सिरोंचा तालुक्यातील बामणी ते झिगाणूर परिसराचा दौरा करून विविध शासकीय योजनांची आणि विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी केली.
दौऱ्यादरम्यान त्यांनी ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच पायाभूत सुविधा आणि रस्त्यांच्या कामांची तपासणी केली. प्रत्येक गावात ग्रामस्थांशी संवाद साधून शिक्षण, आरोग्य, पिण्याचे पाणी, रस्ते व इतर विकासकामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
ग्रामस्थांनी आपल्या अडचणी व समस्या सीईओंसमोर मांडल्या. त्यावर “तुमच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनामार्फत आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातील,” असे आश्वासन सीईओ सुहास गाडे यांनी दिले.
या दौऱ्यात शेख साहेब, गटविकास अधिकारी कस्तुरे, शिक्षण अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी, सरपंच निलीमाताई मडावी, उपसरपंच शेखर गनारपू, उपविभागीय दक्षता नियंत्रण समितीचे सदस्य व सामाजिक कार्यकर्ते, माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य कारेजी मडावी, समाजसेवक रामचंद्र कुमरी, प्रतिष्ठित नागरिक सिरीयाजी मडावी, रामा मडावी, राकेश गावडे, ग्रामसेवक दामोदर सिडाम, सुरेश आनकरी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक आनंद कमटम, सहमुख्याध्यापक, शिक्षक गोवर्धनगीरी देशू तसेच इतर शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.
सीईओंच्या या दौऱ्यामुळे ग्रामीण भागातील विकासकामांना अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे
