स्वातंत्र्यदिनाच्या मंगलमय पर्वानिमित्त…
भारताच्या स्वातंत्र्याला १५ ऑगस्ट रोजी आणखी एक गौरवशाली वर्ष पूर्ण होत आहे. स्वातंत्र्य हा केवळ उत्सवाचा दिवस नसून, देशासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाची आठवण करून देणारा आणि राष्ट्राच्या विकासासाठी नव्या संकल्पाची प्रेरणा देणारा दिवस आहे.
सीमेपासून दूर असलेल्या सिरोंचा तहसीलच्या दुर्गम भागातील नागरिकांनीही देशाच्या विकासप्रवाहात आपले योगदान कायम ठेवले आहे. आदिवासी, शेतकरी, कामगार, विद्यार्थी, महिला, व्यापारी आणि युवक यांच्या कष्टातून सिरोंच्याची सामाजिक व आर्थिक वाटचाल पुढे जात आहे. मात्र विकासासोबतच रस्ते, वीज, शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि मूलभूत सुविधांचा दर्जा उंचावणे ही आजची मोठी जबाबदारी आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी विकासाच्या प्रश्नांकडे पक्षीय राजकारणापलीकडे पाहून सिरोंच्याच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने प्रयत्न करणे गरजेचे आहे. दुर्गम भागातील शेवटच्या नागरिकापर्यंत शासनाच्या योजना पोहोचल्या, तरच स्वातंत्र्याचा खरा अर्थ साकार होईल.
देशभक्ती म्हणजे केवळ ध्वजारोहण नव्हे; तर प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडणे, भ्रष्टाचाराला विरोध करणे, सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे आणि समाजातील प्रत्येक घटकाच्या हक्कासाठी आवाज उठवणे हीच खरी राष्ट्रसेवा आहे.
१५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त सिरोंचा तहसीलवासीयांना ‘त्रिवेणी न्यूज एक्सप्रेस’च्या वतीने हार्दिक अभिनंदन व मनःपूर्वक शुभेच्छा!
जय हिंद! 🇮🇳
जय भारत!
