पद्मा सतीश बोगे बिनविरोध नगराध्यक्ष सिरोंचा नगरपंचायत येथे गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या अविश्वास प्रस्तावाच्या राजकारणाला अखेर नवे वळण मिळाले आहे. नगराध्यक्ष पदासाठी तीन सदस्यांनी दावा केल्याने नगरपंचायतीच्या राजकारणात मोठी उत्सुकता निर्माण झाली होती.
मात्र ११ तारखेला दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास अचानक राजकीय समीकरणे बदलली आणि दोन सदस्यांनी आपले नामांकन मागे घेतले. त्यामुळे पद्मा सतीश बोगे यांची बिनविरोध नगराध्यक्षपदी निवड घोषित करण्यात आली.
१२ तारखेला नगरपंचायत कार्यालयात अहेरीचे एसडीएम श्री राऊत यांच्या उपस्थितीत नगराध्यक्ष निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी समर्थकांनी आनंद व्यक्त करत जल्लोष साजरा केला.
या संपूर्ण राजकीय घडामोडीत बानया जनगाम आणि मधुकर कोल्लूरी, रवि सुल्तान महत्वपूर्ण भूमिका ऋतुराज हलेगेकर यांच्या नावाच्या चर्चेचा विषय ठरल आहे
पद्मा सतीश बोगे यांच्या बिनविरोध निवडीमुळे सिरोंचा नगरपंचायतीच्या राजकारणात स्थैर्य निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सुरेश तिपट्टीवार
