अहेरी तालुक्यातील किष्ठापुर ग्रामपंचायत अर्तगत रामायपेठा येथील टक्कर बाप्पा आदिवासी सुधार योजनेचा बोजवारा!
सौरऊर्जेवरील दुहेरी नळ पाणी योजना ६-७ वर्षांपासून ठप्प; कोट्यवधींच्या योजना कागदावरच, रामायपेटा गाव तहानेने होरपळल अहेरी तालुका एटापल्ली प्रतिनिधि:- गिरीश नरोठे टक्कर बाप्पा आदिवासी सुधार योजनेचा बोजवारा!**सौरऊर्जेवरील दुहेरी नळ पाणी योजना ६-७ वर्षांपासून ठप्प; कोट्यवधींच्या योजना कागदावरच, रामायपेटा गाव तहानेने होरपळले
शाळेत शौचालय नसल्याने विद्यार्थ्याचा बळी; प्रशासनाची डोळेझाक, ग्रामस्थांचा संताप अनावर – आंदोलनाचा इशारा देशाला स्वातंत्र्य मिळून ७८ वर्षे उलटली, गडचिरोली जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांचे विकास प्रकल्प उभे राहिले, मात्र अहेरी तालुक्यातील ग्रामपंचायत किष्टापूर वेल अंतर्गत मौजा रामायपेटा येथे विकासाच्या नावाने केवळ फलक उभे राहिल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.टक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजना (२०१७-१८) तसेच जल जीवन मिशन अंतर्गत प्रत्येक घरापर्यंत नळजोडणी देण्यात आली. मात्र प्रत्यक्षात गेल्या सहा-सात वर्षांपासून नळातून पाण्याचा एक थेंबही आलेला नाही. सौरऊर्जेवर आधारित दुहेरी नळ पाणीपुरवठा योजना पूर्णपणे बंद पडली असून, लाखो रुपयांची यंत्रणा गंज खात पडली आहे.ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, या गंभीर समस्येबाबत ग्रामसेवक श्री. यादव गुळे यांना वारंवार तोंडी कळवूनही कोणतीही दखल घेतली जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे शासनाच्या योजना फक्त कागदावर आणि उद्घाटनापुरत्याच मर्यादित असल्याची तीव्र भावना ग्रामस्थांमध्ये निर्माण झाली आहे.शौचालयाच्या अभावामुळे विद्यार्थ्याचा मृत्यू झालेरामायपेटा येथील जिल्हा उच्च प्राथमिक शाळेत आजही शौचालयाची सुविधा नसल्याने विद्यार्थ्यांना उघड्यावर किंवा तलाव परिसरात जावे लागते. याच निष्काळजीपणामुळे गेल्या महिन्यात तलावात बुडून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची अत्यंत गंभीर घटना घडली. एवढी मोठी दुर्घटना घडूनही संबंधित विभागाने कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याने ग्रामस्थ संतप्त आहेत.‘विकास’ की फसवणूक?ग्रामस्थांचा सवाल आहे की, लोकांच्या उपयोगात न येणाऱ्या योजनांवर सरकारी निधी खर्च करून नेमका कोणाचा विकास केला जात आहे? आदिवासी विकासाच्या गप्पा मारणारे शासन आणि प्रशासन प्रत्यक्षात मात्र गावांच्या मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे.आंदोलनाचा इशारापाणीपुरवठा योजना तातडीने सुरू करावी, शाळेत शौचालय बांधावे आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अन्यथा ग्रामस्थ तीव्र आंदोलन छेडतील, असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.मोठे प्रकल्प… पण गाव अजूनही विकासापासून कोसो दूरजिल्ह्यात मोठमोठे विकास प्रकल्प उभारले जात असतानाही अनेक आदिवासी गावे आजही पिण्याचे पाणी, स्वच्छता आणि मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. रामायपेटा हे त्याचे जिवंत उदाहरण असून, प्रशासनाने तातडीने लक्ष घालून नागरिकांना न्याय द्यावा, अशी जोरदार मागणी होत आहे.
