आलापल्ली परिसरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या विविध शारदा व बथुकम्मा मंडळांना भेटी
देवीचे दर्शन घेत सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी केली प्रार्थना; युवानेते कुमार अवधेशराव बाबा आत्राम यांची उपस्थिती
आलापल्ली | प्रतिनिधी Pushpa Sharma
अहेरी विधानसभा क्षेत्रातील आलापल्ली परिसरात नवरात्रोत्सवानिमित्त भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, विविध शारदा व बथुकम्मा मंडळांच्या माध्यमातून उत्सव उत्साहात साजरा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी आलापल्ली येथील विविध शारदा व बथुकम्मा मंडळांना भेटी देऊन देवीचे दर्शन घेतले व आशीर्वाद घेतले.
यावेळी राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी देवीचरणी नतमस्तक होत सर्व नागरिकांच्या जीवनात सुख, समृद्धी, आनंद आणि भरभराट नांदो, तसेच परिसरातील नागरिकांचे कल्याण होवो, अशी प्रार्थना केली. त्यांच्या भेटीमुळे मंडळांच्या सदस्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
नवरात्रोत्सवानिमित्त आलापल्ली परिसरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शारदा उत्सव आणि बथुकम्मा सणाच्या माध्यमातून नागरिक आपल्या धार्मिक श्रद्धा, सांस्कृतिक परंपरा आणि सामाजिक एकोपा जपत आहेत. महिला, युवक आणि नागरिकांचा या उत्सवात उत्स्फूर्त सहभाग दिसून येत आहे.
या भेटीदरम्यान युवानेते कुमार अवधेशराव बाबा आत्राम, भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध मंडळांचे सदस्य उपस्थित होते. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने देवीचे दर्शन घेत राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी नागरिकांना उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
