जिवनगट्टा व कृष्णार येथे डास संकलन मोहीम; दोन विहिरींमध्ये डासांच्या अळ्या आढळल्या
रात्रीच्या वेळी डासांचे संकलन; प्राथमिक आरोग्य केंद्र तोडसाच्या पथकाकडून कीटकजन्य आजारांच्या दृष्टीने तपासणी
गडचिरोली | एटापल्ली | तालुका प्रतिनिधी : गिरीष डी. नरोटे
एटापल्ली : प्राथमिक आरोग्य केंद्र तोडसा अंतर्गत येणाऱ्या जिवनगट्टा व कृष्णार या गावांमध्ये २३ ते २४ ऑक्टोबर २०२६ दरम्यान रात्रीच्या वेळी Night Mosquito Collection (रात्रीच्या वेळी डास संकलन) मोहीम राबविण्यात आली. यासोबतच गावातील दोन विहिरींमधून डासांच्या अळ्यांचे नमुने (Larva Collection) संकलित करण्यात आले. तपासणीदरम्यान दोन्ही विहिरींमध्ये डासांच्या अळ्या आढळल्याने त्या पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले.
या मोहिमेचा उद्देश डासांची उपस्थिती व त्यांच्या उत्पत्तीची संभाव्य ठिकाणे शोधणे, तसेच कीटकजन्य आजारांच्या प्रतिबंधासाठी आवश्यक माहिती संकलित करणे हा होता. डासांच्या अळ्या आढळलेल्या विहिरींकडे विशेष लक्ष देऊन पुढील प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे महत्त्वाचे ठरणार आहे.
या उपक्रमादरम्यान TCI Foundation, गडचिरोलीचे डॉ. एल. जे. काळेकर सर, आयसी मिलिंद प्रधान सर, ब्लॉक एंटोमोलॉजिस्ट श्रवण राठोड आणि एमपीडब्ल्यू विक्की हिचामी उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत डास संकलन व अळ्यांचे नमुने गोळा करण्याची कार्यवाही करण्यात आली.
डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी
डासांमुळे होणाऱ्या कीटकजन्य आजारांचा धोका कमी करण्यासाठी पाणी साचू देऊ नये, पाण्याची भांडी व टाक्या झाकून ठेवाव्यात आणि विहिरींसह पाणीसाठ्यांची नियमित तपासणी करावी. आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन करून परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर करण्यात येत आहे.
— गिरीष डी. नरोटे
तालुका प्रतिनिधी, एटापल्ली | त्रिवेणी न्यूज एक्सप्रेस
