कसनसूर ग्रामपंचायतीतील पाच गावांतील ग्रामस्थ विविध समस्या घेऊन थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर; प्रश् सोडवण्याचे प्रशासनाचे आश्वासन
गडचिरोली / एटापल्ली (विशेष प्रतिनिधी: श्री. गिरीष डी. नरोटे):
एटापल्ली तालुक्यातील कसनसूर ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येणाऱ्या कसनसूर, पुन्नूर, पारपानगुडा, मुसरामगुडा आणि वेनासर या पाच गावांतील शेकडो महिला व पुरुष ग्रामस्थांनी एकत्र येत आपल्या गाव व परिसरातील प्रलंबित समस्यांच्या निवारणासाठी थेट जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद कार्यालयावर धडक दिली.
या वेळी ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन परिसरातील विविध नागरी व पायाभूत समस्या मांडल्या. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व समस्या गांभीर्याने ऐकून घेत त्यांवर लवकरात लवकर तोडगा काढून प्रश्न सोडवण्याचे सकारात्मक आश्वासन दिले. तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी (CEO) देखील ग्रामस्थांशी सविस्तर चर्चा करून समस्यांचे लवकरात लवकर निवारण करण्याचे आश्वासन दिले आहे.
या वेळी भावी आमदार डॉ. आशिष भैया कोरेटी, अविनाश भैया कोरेटी, माजी सरपंच सुनील मडावी, ग्रामपंचायत सदस्य दामोदर नरोटे, मुसरामगुडाचे गाव पाटील, ग्रामसभा अध्यक्ष रसीनाथ गावडे, पेसा कोष समिती अध्यक्ष सुधाकर कोवाची, पुन्नूरचे पोलीस पाटील विकास झोरे, प्रकाश नरोटे यांच्यासह कसनसूर परिसरातील पाचही गावांतील शेकडो नागरिक, महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
